Maharashtra Politics | पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारणारे आणि काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
धंगेकर नाराज, पक्ष बदलाचा विचार?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी धंगेकर यांचा पराभव केला. काँग्रेसकडून योग्य साथ न मिळाल्याने पराभव झाल्याची भावना धंगेकर यांच्या मनात असून, याच कारणामुळे ते पक्षबदलाचा विचार करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
‘ऑपरेशन टायगर’मधून धंगेकर सेना गटात?
उदय सामंत (Uday Samant) यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात ‘मिशन टायगर’ जोरदार पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता धंगेकर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाची शक्यता अधिकच बळावली आहे.
स्टेटसद्वारे दिले संकेत?
रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसवर भगवा पंचा परिधान केलेला फोटो शेअर केला आणि त्यासोबत अजय-अतुल यांचे “तेरे क़दमों के तले मिट्टी” हे गाणे लावले. या स्टेटसवरून ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. धंगेकर आधीच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
सध्या शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात धंगेकर भेट घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धंगेकर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. ३० डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आणखी जोर मिळाला होता. (Maharashtra Politics)
Title : Maharashtra Politics Ravindra Dhangekar Likely to Join Shinde group