“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”

Maharashtra Politics | विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार तथा महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. रविवारी ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) प्रचारासाठी सांगलीत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. (Maharashtra Politics )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे अर्जुन आहेत. तर, शरद पवार (sharad pawar) हे शकुनी मामा असल्याचं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या राजकीय टिप्पणीची सध्या राज्यभर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणले. तर, राज्य कसं चालवायला हवं याबाबतचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण, फडणवीस यांना सगळ्यांनी घेरलं. कारण फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले आहे. त्यामुळेच राज्यात वेगवेगळी आंदोलने उभी करण्यात आली.”, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.(Maharashtra Politics )

“शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनीमामा”

पुढे त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत. तर, अर्जुनची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी बजावत असेल तर त्याचं नाव हे देवेंद्र फडणवीस आहे. महाराष्ट्रात विकासाचे विजन असलेला नेता म्हणजे फडणवीस आहेत. मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पण, 2019 मध्ये फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले.  मात्र, हे आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवले.”,असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

“उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मराठा आरक्षण घालवलं. पण, टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत”, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केलाय.(Maharashtra Politics )

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदाभाऊ खोत यांना चांगलाच धक्का दिला होता. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. अशात सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना थेट शकुनी मामा म्हटलं आहे.

News Title –  Maharashtra Politics Sadabhau Khot on Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी

आज लाडक्या भावाला राखी नेमकी कधी बांधावी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार!

‘या’ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार रोमँटिक टर्न!

मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य!