Maharashtra politics | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच पक्ष आता रणनीती आखत आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या दौऱ्याला देखील आता सुरुवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील निवडणुकीसाठी दौरे करत आहेत. अशात भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. (Maharashtra politics )
भंडारामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारे भंडाऱ्यातील भाजपचे माजी नेते शिशुपाल पटले यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे.
शिशुपाल पटले कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
शिशुपाल पटले हे आता कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टरोजी ते कॉँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं म्हटलं जातंय.शिशुपाल पटले हे भंडारा जिल्ह्यातील एक बडा नेता म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच (Maharashtra politics )झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला.
विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने 10 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला.अशात शिशुपाल पटले हे कॉँग्रेसच्या वाटेवर असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शिशुपाल पटले यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवली.
प्रफुल पटेल यांचा केला होता पराभव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा फटका मानला जात आहे. शिशुपाल पटले जर कॉँग्रेसमध्ये गेले तर कॉँग्रेसची विदर्भात ताकत वाढेल. शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.(Maharashtra politics )
दरम्यान, गेल्या महिन्यात शिशुपाल पटलेंनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला होता. राज्य सरकार शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामं होत नाहीत, त्यामुळे भाजपचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी आधीच दिला होता.
News Title : Maharashtra politics Shishupal Patle may join Congress
महत्वाच्या बातम्या-
या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!
मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण
नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज
आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज