फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?

Maharashtra Politics | राज्य विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या भेटीची आता एकच चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान उद्धव ठाकरेंनी महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशात ते दोघेही एकत्र दिसून आल्याने या भेटीमुळे एकच चर्चा रंगल्या आहेत. लिफ्टमध्ये त्यांच्यात काय चर्चा झाली?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खुलासा केलाय.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकच लिफ्टमध्ये

लिफ्टमध्ये दरेकर देखील उपस्थित होते. त्यांनी या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत खुलासा केलाय. “लिफ्टमध्ये मी, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही सोबत आले. त्यावेळी कुणीतरी म्हणालं की तुम्ही दोघ एकत्रित आहात बरं वाटतं, त्यावेळी उद्धवजी मला म्हणाले की, याला पहिलं बाहेर काढा. त्यावेळी मी म्हणालो की, तुमचं अजून समाधान झालं नाही का? माझी बाहेर जायची तयारी आहे. होताय का एकत्र. मी म्हणालो, बोलता तसं करा. त्यानंतर आमच्यात थोडासा हास्यविनोद झाला आणि आम्ही लिफ्टमधून बाहेर आलो.”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

तसंच उद्धवजी विरोधी दिशेला गेले. आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी बसायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत, असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले. राजकारणात आम्ही कोणाची कायमचे शत्रू नसतो, भेटलो तर बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती असते. त्यामुळे कधी भेटलो तर याचा वेगळा अर्थ काढण्याची (Maharashtra Politics)गरज नसल्याचं दरेकर यांनी म्हटलंय.

प्रवीण दरकेर यांनी सांगितली सर्व हकीकत

या प्रसंगापुर्वी अजून एक प्रसंग घडला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी तेथे उद्धव ठाकरे आणि अनिल परब देखील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मोठी कॅडबरी देखील दिली.

तर, यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्यांवरून टीका केली. शेतकरी प्रश्न, पोलिस भरतीमधील अडथळे यासोबतच इतर बऱ्याच विषयांवरून त्यांनी सरकारवर निशाणा  (Maharashtra Politics) साधला.

News Title –  Maharashtra Politics Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

“राम मंदिराला गळती, पेपरला गळती..”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कडाडले

विधानसभेच्या ‘या’ 8 आमदारांनी दिले आमदारकीचे राजीनामे! नार्वेकरांनी दिली माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल