भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ

Maharashtra Politics | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे बडे नेते पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात सामिल होणार असल्याचं कळतंय. कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजित घाटगे भाजपपासून फारकत घेणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजप नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ

समरजित घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून कमळ हटवलं आहे. वारसा शाहूंचा, लढा सर्वसामान्यांचा असं समरजित घाटगे यांनी त्यांच्या वॉलवर लावलं आहे. समरजित घाटगे यांनी कमळ हटवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने समरजितसिंह घाटगे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमधल्या मेळाव्यात घाटगे पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

Maharashtra Politics | भाजप नेत्याकडून मरजित घाटगेंची मनधरणी

भाजपच्या नेत्यांनी बुधवारी समरजित घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, यांच्यासह इतर नेते समरजित घाटगे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

इतक्या लवकर पक्ष सोडण्याचा निर्णय न घेता आणखी काही राजकीय घडामोडी विधानसभा निवडणुकीपर्यंत घडतात का? याचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्यावा, असं भाजपचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, मराठा आरक्षणानंतर आता…

तज्ज्ञांचा पालकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; मुलांना ‘या’ गोष्टी नक्की शिकवा

मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून महत्वाचा इशारा