Top News पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी परीक्षेबाबत नियमावली जाहीर!

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील महिन्यात होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठीची नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केल्या पासून ते परीक्षा केंद्राच्या बाहेर पडेपर्यंत काय कारायचे आणि काय करु नये या सगळ्या गोष्टींबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

परीक्षा केंद्रात उमेदवारांनी तीन पदरी मास्क घालणे अनिवार्य आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात जाताना मास्क, हातमोजे, आणि सॅनिटाईझरची छोटी पिशवी दिली जाणार आहे. परीक्षेच्या संपूर्ण परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सतत हात सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, ह्या परीक्षा ऑक्टोबर आणि नोहेंबर महिन्यात होणार आहेत. त्यासाठी ही नियमावली जाहिर केली आहे.

ताप, सर्दी, खोकला असे कोरोनाची लक्षणे असल्यास संबंधित उपकेंद्रावरील पर्यवेक्षिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही माहिती द्यावी. तसेच प्रत्येकाने ‘आरोग्य सेतू’ हे अॅप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे.

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे मूर्खपणा’; खासदार संभाजीराजेंची टीका

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई काळाच्या पडद्याआड

‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’; कंगणाने उधळली मुक्ताफळ

धक्कादायक! महिलेने केला दीड वर्षाच्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या