Maharashtra Rain | राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे जवळपास सर्वच धरणे आता भरली आहेत. उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पणयाचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. हे धरण 86 टक्के भरलं असून, 80 हजार क्युसेक्सने धरणात पाण्याचा विसर्ग येतोय. तर, आज (4 ऑगस्ट) संध्याकाळी उजनी धरणातून 20 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडला जाणार (Maharashtra Rain) आहे.
त्यामुळे काही गावांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्क राहा, असं आवाहन करण्यात आलंय. धरणाकडे येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक्सपर्यंत पोहोचू लागल्याने आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून 20 हजार क्युसेक्स विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे.
पंढरपूरला पुराचा धोका
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम (Maharashtra Rain) होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे जाते. वीर धरणमधून पाणी सोडल्याने भीमा नदी आता दुथडी भरून वाहत आहे.
त्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका वाढणार आहे. येथे पाऊस असाच सुरू राहिला तर येणाऱ्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढू शकतो. मात्र, या पावसामुळे सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
राज्यातील 20 धरणे भरली
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील जवळपास 20 धरणे भरली आहेत. त्यात 10 ते 12 धरणांमध्ये 70 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तर, कोकणातील धरणक्षेत्रांत हलका ते मध्यम पाऊस झाल्याने धामणी, तिल्लारी, बारवी, मोडकसागर यासह सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे (Maharashtra Rain)कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
News Title : Maharashtra Rain 20 dams filled with water
महत्त्वाच्या बातम्या-
रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!
पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार
“…तर आपल्या आई-बहिणींना फिरणं मुश्किल होईल”; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता..
सतर्क! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी