Maharashtra Rain | कर्जत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नदीच्या महापूरात अडकलेल्या एका युवकाला तरूणाने वाचवलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, रायगड, सांगली, कोल्हापूर, मुंबई, लातूर येथे मोठ्या प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
तरूणाने पूरात अडकलेल्या युवकाचे बचावले प्राण
रायगड येथील कर्जेत येथे मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. कर्जत येथील टाकावे येथील एक तरूण उल्हास नदीच्या महापूरात अडकला होता. पाणी वाहून नेत असल्याने त्याने हिंमत हारली नाही. तो जगण्यासाठी धडपड करत होता. त्याच्या या हिंमतीला तात्काळ बचाव पथकाने साद दिली. त्यामुळे तरूणाचे प्राण बचावले आहेत.
कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरूण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला. पोहता येत असल्याने उल्हास नदीला पूर आलेला असताना देखील जिद्दीने नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तेथे तो थोडावेळ थांबला. त्यानंतर बचाव पथकाने महापुराने वाहत्या पाण्यात उतरूण त्या तरूणाला सुखरूप बाहेर काढले. (Maharashtra Rain)
ही माहिती मिळताच कर्जत तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी खोपोली येथील रेस्कू टीमला पाचारण केलं. या टीमचे सदस्यांनी गुरूनाथ साठेलकर यांच्या नेतृत्वाखाली किमान 300 मीटर आत जावून झाडाच्या सहाय्याने पुरातून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पूरात अडकलेल्या तरूणाला बाहेर काढण्याचं काम केलं. (Maharashtra Rain)
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
बुधवारी रात्रीपासून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रस्त्यालगत पाणी साठलं आहे. मात्र सुदैवानं रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. (Maharashtra Rain)
News Title – Maharashtra Rain Karjat Flood In Young Man Save His Life Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन
महिलांनी आपल्या जीवनात ‘या’ सहा गोष्टी कुणालाही सांगू नयेत; अन्यथा वैवाहिक जीवन..
मुंबईत पावसामुळे दाणादाण, आजही रेड अलर्ट जारी; पोलिसांकडून मुंबईकरांना महत्वाच्या सूचना
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल; आता थेट..
“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?