Maharashtra Rain | राज्यात पुण्यासह इतर भागात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काही धरणक्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. शुक्रवारी हवामान विभागाने रेट अल्रर्ट जारी केला आहे. यामुळे आठ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सांगली, कोल्हापूर या आठ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. (Maharashtra Rain)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पाऊस होता. परंतू पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे. पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावं लागलं. मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. तसेच पुणे शहरात देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील शाळा, महाविद्यालये आज सुरू राहणार आहेत. परंतु पुण्यासह आज राज्यात आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे. (Maharashtra Rain)
आठ जिल्ह्यांमध्ये शाळा बंद
राज्यात गुरूवारी आठ जिल्ह्यांमध्ये पावसाच्या रेड अलर्टमुळे शाळा बंद केली. यामुळे शाळा आणि महाविद्यालये आठ दिवस बंद राहणार आहेत. त्यात आता ठाणे, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सांगली, कोल्हापूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. (Maharashtra Rain)
खडकवासला धरणातून पाणी रस्त्यावर येत होतं. मात्र आता पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Rain)
रत्नागिरीत पावसाचा जोर
रत्नागिरीत जिल्ह्याला हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट दिला गेला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. जगबुडी नदी धोका पातळीवर तर गोदावरी नदी इशारा पातळीवर आहे. जगबुडी नदीमधील पातळीवर 9 मीटर वर तर गोदावरी नदी 5.40 मीटरवर आहे.
News Title – Maharashtra Rain Marathi News Update
महत्त्वाच्या बातम्या
“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल
“माझी हात जोडून विनंती…”; महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video