Rain Upadate | महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र आजही अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे, दरम्यान त्यातच आता राज्यातील विविध भागांमध्ये आज पुन्हा एकदा हवामान विभाग (IMD) कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून आज कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, आज अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याचा मोठा इशारा
कोकण आणि विदर्भ या ठिकाणी आज दिवसभर जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार (Rain Upadate) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड आणि साताऱ्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून आज ठाण्यासह कोकणातील पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain Upadate) शक्यता आहे.
Rain Upadate | पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
दुसरीकडे बुलढाणा, अकोला, वाशिक यवतमाळ याठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडरा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुण्यातही आज हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुण्याती घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून, जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्यापासून ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असेल मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस चांगला जोर पकडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नवऱ्यानेच दिली बायकोची सुपारी; कारण ठरले मित्र, 3 वर्षांनंतर झाला खुलासा
“नासक्या आंब्याला खड्यासारखा बाजूला करणार”; शरद पवारांचा इशारा
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!
गुड न्यूज! आयफोन झाले स्वस्त, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही
राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट