Maharashtra Rain | राज्यात पावसाने दडी मारली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन आठवड्यापुर्वी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबई-पुण्यात तर जनजीवन विस्कळीत झालं होतं. सध्या येथे पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. (Maharashtra Rain)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाला आहे. सध्या पाऊस थांबला आहे. आता पाऊस आज 15 ऑगस्टपासून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
आजपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागानं (IMD) आज राज्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज दक्षिण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असेल.
आजपासून 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिलीये.काही दिवसांपुर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस पडत नसल्याची (Maharashtra Rain)स्थिती आहे.
विदर्भासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा
दुसरीकडे पुणे, मुंबई, रायगड , कोल्हापूर येथे चांगलाच पाऊस पडून गेलाय. (Maharashtra Rain) पावसामुळे पुण्यातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे.
दरम्यान, कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये देखील पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस होईल. मात्र, पावसाची तीव्रता कमी असल्याने कोणताही (Maharashtra Rain)अलर्ट देण्यात आला नाही.
News Title : Maharashtra Rain update 15 august
महत्वाच्या बातम्या-
स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!
बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती
“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”
लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..