Maharashtra Rain update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आजपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील अनेक भागात सध्या सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.(Maharashtra Rain update )
राज्यात पाऊस पुन्हा परतला
आज हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. आज (17 ऑगस्ट) मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra Rain update )
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान येथे अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.
दुसरीकडे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.(Maharashtra Rain update )
याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title : Maharashtra Rain update 17 august
महत्वाच्या बातम्या-
iPhone 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या ऑफरबद्दल
विधानसभेपूर्वीच मोदींचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; ‘या’ 3 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी
वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video
देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…
तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती