काळजी घ्या! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Update | राज्यातील अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पावसाने जनजीवन (Maharashtra Rain Update) विस्कळीत झाले आहे.

अशात हवामान विभागाने पावसाचा जोर अजून वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. मुंबई, पुणे, सातारा, तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे या भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यात तुफान बरसणार

कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यात 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

साताऱ्याच्या घाट विभागात आज व उद्या तुरळक (Maharashtra Rain Update)ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग तर पुणे व कोल्हापूरच्या घाट विभागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

त्यामुळे हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भात देखील पावसाचा जोर कायम आहे. नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये तर प्रशासन अलर्ट (Maharashtra Rain Update)मोडवर आले आहे. येथील पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे येथील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

News Title –  Maharashtra Rain Update 23 july 

महत्त्वाच्या बातम्या- 

“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल

गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी

“बजेट देशाचं की बिहार-आंध्र प्रदेशचं?”; अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया

आयकर प्रणालीत महत्वाचे बदल; तुम्हाला किती कर भरावा लागणार?

मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!