सतर्क! पुढील काही तासांत धो-धो बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update | बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. राज्यात आगामी चार दिवसांमध्ये पावसाचा जोर जास्त वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain)इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

हवामान विभागाने आज 24 ऑगस्टरोजी पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 28 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील चार दिवस धोक्याचे

मुंबई आणि पुण्यासह नाशिकमध्ये आज पहाटेपासूनच पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून येथे पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

पुढील चार ते पाच दिवस पावसाचा वेग अजून वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना देखील पावसाचा जोर वाढणार असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

त्याचबरोबर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

News Title –  Maharashtra Rain Update 24 august

महत्त्वाच्या बातम्या-

कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..

महाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावच्या 27 भाविकांचा मृत्यू

मोठी बातमी!’गब्बर’चा क्रिकेटला अलविदा; शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

आज महाराष्ट्र बंद आहे की नाही?, कोर्टाच्या मनाईनंतर मविआने घेतला मोठा निर्णय

आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!