Maharashtra Rain Update | हवामान विभागाने आज राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज (4 ऑगस्ट) मुंबईसह (Mumbai) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार (Maharashtra Rain Update) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी
याचबरोबर मुंबईह उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अनेक भागांत देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एकंदरीत हवामान विभागाने आज मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भाला (Maharashtra Rain Update) यलो अलर्ट दिला आहे.
पुण्याला रेड अलर्ट
पुण्याला देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.
यामुळे कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. सध्या खडकवासला धरणातून 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, चासकमान (Maharashtra Rain Update) धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.
News Title- Maharashtra Rain Update August 4
महत्वाच्या बातम्या-
“कंगना राणौतचा चेहरा पाहिला तर पाप..”; शंकराचार्य यांचं वक्तव्य चर्चेत
आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा
“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले
“अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज”
‘मी ढेकणांच्या नादी लागत नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल