पावसाचा जोर कायम! ‘या’ 19 जिल्ह्यांना IMD चा महत्वाचा इशारा

Maharashtra rain update | गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपलं आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून पावसाचा फटका बसल्याने जनजीवन अतिशय विस्कळीत झालंय.पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झालं आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पाण्यात अनेक जनावरंही वाहून गेली आहेत. (Maharashtra rain update)

नांदेड जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं असून अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. जिल्ह्यतील 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. तर, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 24 तासांत 71 मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आजही जोरदार बरसणार असल्याचा इशारा दिला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

आज खानदेशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 अर्थातच बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या 19 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.(Maharashtra rain update)

विदर्भामधील अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तसेच सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

IMD चा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भ आणि मराठवाड्यात आजही वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra rain update)

पुढील 24 तासात मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 27°C च्या आसपास असेल.

News Title :  Maharashtra rain update September 3

महत्वाच्या बातम्या-

निक्कीवरुन अरबाजची गर्लफ्रेंडची भडकली; म्हणाली…

आनंदाची बातमी! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता फक्त ‘इतक्या’ मिनिटांत गाठता येणार

सोन्याने दिली स्वस्ताईची वार्ता, ‘इतका’ घसरला भाव; जाणून घ्या आजचे दर

भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश

1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या बहीणींना किती लाभ मिळणार?, 4500 की फक्त1500?