Maharashtra Rain Update | राज्यात मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, वाशिमसह इतर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावत काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालं आहे.
विदर्भाला पावसाने झोडपून काढले
तसंच जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपून काढले असताना पूर्व विदर्भ मात्र अद्याप जोरदार पावसाची वाट बघत आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतीचं साहित्य सुद्धा पावसात वाहून गेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात काल (Maharashtra Rain Update) दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मुंबईतही पावसाचे थैमान
दुसरीकडे मायानगरी मुंबईत रविवारी रात्रभरात तब्बल 300 मिमी पाऊस पडला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पडला. सध्या हळूहळू रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा आता सुरु झाली आहे. मात्र, पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज (Mumbai Rain) आहे.
रायगड जिल्ह्यात तर अतिमुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) पडला. रायगड किल्ल्यावर यामुळे बरेच पर्यटक अडकले होते. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशात हवामान विभागाने पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
News Title : Maharashtra Rain Update Today 9 july
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे टाकणार ‘ही’ जबाबदारी?, लवकरच बांधणार शिवबंधन
शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी
मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर, पाहा कुठे कुठे असणार सुट्ट्या