बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी!; महाराष्ट्रातील एक कोटी लोकांना मिळालं सुरक्षाकवच

मुंबई | मागील वर्षी कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर जगभरात लसीवर संशोधन चालू झालं. या वर्षीच्या जानेवारीपर्यंत अनेक लसींना मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर जगभरात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबण्यात आली. भारतात देखील जानेवारीच्या सुरवातीला लसीकरण चालू केलं गेलं. आता या लसीकरण मोहिमेला चार महिने उलटून गेले आहेत. नुकत्याच आलेल्या नवीन आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य या लसीकरण मोहिम राबवण्यात आघाडीवर आहे.

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. शिवाय राज्याने यामध्ये विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे 1 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे. ही आकडेवारीत येत्या काळात आणखी वाढवण्यात येईल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केलं आहे.

महाराष्ट्रात 16 जानेवारीला लसीकरण मोहिम राबवण्यास सुरवात केली गेली.  महाराष्ट्रात त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आलं. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. तिसऱ्या टप्पयात ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आलं. 1 मार्च पासून तिसऱ्या टप्पा सुरू करण्यात आला होता. तर चौथ्या टप्पा नुकताच 1 एप्रिलला चालू झाला आहे.

दरम्यान, राज्यात 1 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्यानं राज्यात लसीचा तुटवडा लवकर जाणवू लागला आहे. महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे आणखी लसी देण्याची मागणी केली आहे तर राज्यात लसीच्या वितरणावरून राजकारण देखील तापलेलं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोलकताने फोडला विजयाचा नारळ; राहुल-राणाच्या खेळीपुढे पांडे-बेयरस्टोची खेळी व्यर्थ

इंदोरीकर महाराजांचा थोडा वेळ गेला, मात्र ‘या’ मंडळींना चांगला झटका दिला!

सेक्सनंतर प्रेयसीने केली विचित्र मागणी, वैतागलेल्या प्रियकराने थेट तज्ञांकडे मागितली मदत

लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती हाती, ‘या’ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊन?

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More