बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा…”, ममता बॅनर्जींना खात्री

मुंबई | केंद्रात भारतीय जनता पक्ष (BJP) पुर्ण बहुमताच्या (Full Mejoirity) जोरावर सत्तेत आहे. भाजपकडून केंद्रीय सत्तेचा गैरवापर (Abuse Of Power) केला जात आहे, अशी टीका सातत्यानं विरोधी पक्ष (Opposition Parties) भाजपवर करत आहेत. अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chif Minister Of West Bangal Mamta Banerjee) या भाजप विरोधी आघाडीसाठी देशभर दौरे करत आहेत. परिणामी सध्या त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री  Uddhav Thackeray सध्या आजारी असल्यानं Mamata Banerjee यांची भेट त्यांनी नाकारली होती. परिणामी शिवसेनेकडून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. राज्याच्या आगामी राजकीय वाटचालीवर ममता बॅनर्जी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा सरकारी दहशतवाद्यांचा सामना करेल, अशी खात्री असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटल्याचं राऊत म्हणाले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काॅंग्रेस वगळता सर्वांची भेट घेतल्यानं विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर तर अवघ्या देशाला माहिती आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज्यातील उद्योजगांशी सुद्धा चर्चा केली आहे. परिणामी भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मदतीनं राज्यातील उद्योग बंगालला पळवले जात असल्याची टीका भाजपनं केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

‘काँग्रेस एकला चलो साठी सुद्धा तयार’; ‘या’ काँग्रेस खासदाराचं मोठ वक्तव्य

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

मोठी बातमी! आता नागपूरात एंट्री करायची असेल तर ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More