महाराष्ट्र मुंबई

राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे, आजही १० हजारांहून अधिक रूग्ण बरे…

मुंबई |  राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के  एवढे आहे.

आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी उपलब्ध करुन देणार, अजितदादांचा शब्द

पार्थ प्रकरणावर रोहित पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…..

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या