चंद्रपूर महाराष्ट्र

लालपरीची जिल्हाबंंदी उठणार; सरकारचा महत्वपुर्ण निर्णय येण्याची शक्यता!

चंद्रपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा तब्बल चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र लाॅकडाऊनबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यातील जिल्हाांतर्गत बससेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्य सरकार  एसटीसेवा सुरू करण्यासाठी अनुकूल असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच आठवड्याच्या कालावधीत कोरोनाच्या नियमांचे पालन करुन एसटीसेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली आहे.

लाॅकडाऊन लागू झाल्यावर राज्यातील एसटीसेवा बंद करण्यात आली होती. मात्र अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाल्यावर मर्यादीत एसटीसेवेलाही परवानगी देण्यात आली होती. सध्या एसटीसेवा सुरु असली तरीदेखीस जिल्हांतर्गतच सेवा सुरु असून प्रवाशांची संख्याही मर्यादीत ठेवण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पुरती कोलमडलेली आहे. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन प्रकाश आंबेडकरांकडून राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर डफडं वाजवून आंदोलन करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही”

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

‘हे’ चार वर्ल्ड रेकॉर्ड आहेत केवळ महेंद्र सिंग धोनीच्या नाव

धोनीच्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

काळजी घ्या!; कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या