उत्तम मराठी बोलता येतं? ही नोकरी तुमचीच!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | सरकारी नोकरी (Job) हे अनेकाचं ध्येय असतं. तुम्ही देखील एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदीची बातमी आहे. तुम्ही महाराष्ट्रातून असाल आणि मराठी भाषिक असाल तर मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही नोकरी करु शकता.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र स्टेट बँकेंने (Maharashtra State Bank) अधिसूचना जारी केली आहे. यासंदर्भात सरकारी पोर्टलवर सूचना देण्यात आली आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई (Mumbai) असणार आहे. अधिसूचनेत दिल्याप्रमाणे 21 फेब्रुवारीपर्यंत या पदासाठी तुम्ही अर्ज करु शकता. अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता.

महाराष्ट्र स्टेट काॅर्पोरेटिव्ह बँकेत मॅनेजिंग डायरेक्टर (Managing Director) या पदासाठी जागा निघाल्या आहेत. यासाठी उमेदवारानं कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं गरजेच आहे. चार्टड/काॅस्ट अकाउंटंट असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 60 च्या आत असाव.

उमेदवाराला आधुनिक बँकिगचं (Digital Banking) आणि आयटीचं ज्ञान असावं. ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाचा कमीतकमी आठ वर्षाचा अनुभव असावा. सहकारी बँकिंगचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराला उत्तम मराठी बोलता यावं. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन,9, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स लेन, मुंबई या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe