मुंबई | सध्या राज्यभारात (HSC Exams) बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. 2 वर्षांच्या लाॅकडाउन नंतर या वेळेस ही परीक्षा ऑफलाईन सुरु झाली आहे.
अनेक वेळा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका होत असतात. तसंच काहीसं यावेळी सुद्धा झालं आहे. पहील्याच दिवशी बारावीच्या इंग्रचीच्या (English Question Paper) पेपरमध्ये चक्क प्रश्न पत्रिकेत प्रश्नांच्या जागी उत्तरं छापून आली होती. त्यावेळेस सगळी कडे एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार मराठवाडा येथे अंबेजोगाई येथे घडला. बारावीचा कॅम्पुटर टेक्निक (Computer Technique Question Paper) विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका आली आणि एकच गोंधळ उडाला.
हा सगळा प्रकार लक्षात घेत परीक्षाच्या सेंटरवरील सेंटर चालकांचा आणि स्टाफचाही गोंधळ उडाला. पुढे काय ? शेवटी सेंटर चालकांना इंग्लीश मिडीयमचा पेपर मराठीत भाषांतर करावा लागला.
थोडक्यात बातम्या-
सावधान! जर तुम्ही समार्टफोन खिशात ठेवत असाल तर होऊ शकतो असा परिणाम
भारतातील ‘या’ 3 जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे
विरोधक आक्रमक; कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर केली घोषणाबाजी