बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी अशी ‘जलयुक्त शिवार योजना’ भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकली होती. इतकंच नाही तर हे जलयुक्त शिवार अभियान तांत्रिकदृष्ट्या फेल झालं असल्याची टीकाही करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेतील गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना देखील करण्यात आली होती. पण आता या योजनेवर लावलेले आक्षेपच फेटाळून लावण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारच्या जलसंधारण विभागाने अखेर क्लिनचीट दिली आहे. जलसंधारण विभागाने गैरव्यवहाराच्या चौकशीनंतर एक अहवाल सादर केला. या अहवालात जलयुक्तशिवार योजनेचं काम व्यवस्थित झालं नसल्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. तर या अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षानूसार या योजनेतील कामामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढले आहे.

जलसंधारण विभागाने या चौकशी दरम्यान 1 लाख 76 हजार 284 पैकी जवळपास 58 हजार जलयुक्त शिवारांचे मुल्यमापन केले होते. सखोल चौकशीनंतर जलसंधारण विभागाने संपुर्ण अहवाल सादर केला आणि जलयुक्त शिवार अभियानाला क्लिन चीट दिली. या योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.

भूजल पातळी वाढवण्यात जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली नसून या योजनेतील 2015-16 मधील त्रृटी 2017-18 पासून दूर करण्यात आल्या असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जलसंधारण विभागाच्या या अहवालानंतर सरकारच्या म्हणण्याने योजना बदनाम होत नाही, शेवटी विजय सत्याचाच होतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

अन् राहुल गांधीनी भर बैठकीत विचारलं इथे कोण कोण दारू पितं?

धाकधुक पुन्हा वाढली! देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत वाढ, पाहा आकडेवारी

‘तो’ दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

हरभजन आणि पाकिस्तानी खेळाडूचं या मुद्द्यावरून रंगलं ट्विटर वॉर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More