बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 9 टक्क्यांवरून 12 टक्के झाला असल्याची माहिती अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

1 जानेवारी 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील महागाई भत्ता 9 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात यावा, तसेच महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै  2019 पासून रोखीने देण्यात यावी, असं राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून जारी केलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019  या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहली धोनीप्रमाणे ‘ही’ गोष्ट सहन करून शकत नाही- गौतम गंभीर

-15 जणांसमोर शूट झालेल्या न्यूड सीनबद्दल अभिनेत्री म्हणते…

-मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल- संजय राऊत

-“कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”

-मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेस सकारात्मक- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More