मुंबई | आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला जाईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
राज्यातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रूपयांची मदत देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे. दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी, ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने समाजातील सगळ्या घटकांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल.
महत्वाच्या बातम्या
-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली
-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल
-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू
-राष्ट्रवादीचे ‘राजे’ शिवबंधनात अडकणार? चर्चांना उधाण
Comments are closed.