बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 8 हजार 385  रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, 08 हजार 753 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 156 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 58,36,920 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.1 टक्के एवढं झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस??; अमित शहांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रावसाहेब दानवेंनी सांगितला महाराष्ट्रातील करेक्ट कार्यक्रमाचा अर्थ, म्हणाले…

‘लसीकरण झाल्यावर प्रत्येकाने 500 रूपयांची पंतप्रधान निधीत मदत करावी’; भाजपच्या या महिला मंत्र्यांचं आवाहन

“राष्ट्रवादीने दगड मारला कशावरून, कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?”

‘मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं’; पक्षांतर्गत वाद पेटला!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More