बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 10 हजार 548 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, 8 हजार 418 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 171 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 58,72,268 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढं झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या-  

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

आज देखील सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा ताजे दर

मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? – रोहिणी खडसे

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More