पुणे | भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामगार, मजूर, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडविण्याची त्यांना तळमळ आहे. पुढील काळात याच आग्रही भूमिकेने लढण्यासाठी तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाने महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी सांगितले. भोसरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाठिंबा जाहीर केला.
मजूर, कष्टकरी, कामगारांच्या काही मागण्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा केली. कामगारांना मिळणारी तुटपुंजी मदत न देता त्यांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. बांधकाम महामंडळाचे बजेट वाढवून मजुरांच्या आरोग्य, शिक्षण आणि पेन्शन याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढील काळात आग्रही भूमिका घेणार असल्याचं आडागळे यांनी सांगितलं.
आमदार महेश लांडगे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा मिळवून दिली असल्याचंही आडागळे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भगतसिंहांचा अपमान ठरेल- कन्हैया कुमार https://t.co/PuMSaNNAM7
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
परळीत काही खरं नाही ही अफवा आहे- पंकजा मुंडे – https://t.co/IvI6Zi7k24 @Pankajamunde @BJP4Maharashtra @dhananjay_munde @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
कोरेगावमध्ये मुस्लिम समाजाचा शशिकांत शिंदेंना पाठिंबा https://t.co/bTzii3PwFQ @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
Comments are closed.