बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी- फक्त गृहमंत्रीच नव्हे ‘या’ दोन खात्यांचे मंत्रीही बदलणार!

मुंबई | उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्रिपदासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात आलं असून त्यांनी गृहमंत्रिपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवावं, यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या या पत्रात फक्त गृहमंत्रिपदच नव्हे तर आणखी दोन खात्यांचे मंत्री बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री केल्यानं त्यांच्याकडे असलेलं कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. कामगार मंत्रिपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं आहे, तर उत्पादन शुल्क मंत्रिपदाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा धक्कादायक आरोप केला होता. या आरोपांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवलं आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता या प्रकरणात सीबीआय काय अहवाल देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ नेत्याची गृहमंत्रिपदी नेमणूक करा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

आता नक्षलवाद्यांचं काही खरं नाही; अमित शहा म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More