आता ‘नो पार्किंग’च्या गाड्या उचलून नेण्यातही घोटाळा? चौकशीची मागणी

मुंबई | राज्यात आला ‘नो पार्किंग’च्या गाड्या उचलून नेण्याच्या कामातही मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी आरोप केलेत.

नागपूरची विदर्भ इन्फोटेक ही कंपनी ‘नो पार्किंग’मधल्या गाड्या उचलून नेण्याचं आणि सरकारी कार्यालयांमधील संगणकांची देखभाल करण्याचं काम करते. मात्र या कंपनीला गेल्या 3 वर्षात 8 ते 10 मिळालेली 100 कोटी रुपयांची कामं संशयास्पद आहेत, याची चौकशी करा, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय. 

विदर्भ इन्फोटेक कंपनी मुख्यमंत्र्यांचे लाडके अधिकारी प्रवीण दराडे यांच्याशी संबंधित असून दराडे जिथं गेले तिथं या कंपनीला कामं मिळत गेली, असा आरोप संजय निरुपम यांनी केला होता.