बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंहगडावर जा अन् बंगल्यात मुक्कामी राहा, भन्नाट योजना सुरु!

पुणे |  पुण्यात आल्यावर सिंहगडला प्रत्येकजण भेट देतोच. पुण्यापासून काही अंतरावर असणारा सिंहगड किल्ला हा इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. तुम्हीही दुर्गवेडे असाल किंवा तुम्हाला गडावर मुक्काम करायचा असेल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी खास योजना आणली आहे.

सिंहगडावरील रेव्हून्यु वेलफेअर असोसिएशनच्या ताब्यात असलेला बंगल्याची डागडुजी करण्यात आली आहे.  सरकारच्या नव्या पर्यटन धोरणानुसार पर्यकांच्या निवासासाठी या बंगल्याचं नुतनीकरण महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर तो बंगला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच त्या बंगल्यात पर्यटकांना मुक्कामी राहता येणार आहे.

सिंहगडावरील बंगल्यात राहण्यासाठी भन्नाट सोयीसुविधा पर्यटकांसाठी देण्यात येणार आहे. या बंगल्यात 2 स्यूट,1 व्हीआयपी स्यूट, महिला पुरूषांसाठी प्रत्येकी 8-8 बेड्सचे डॉरमेटरी, 1 रेस्टॉरन्ट, 1 डायनिंग आणि स्वागत कक्षही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, पर्यटकांसाठी 3 तंबू उभारण्यात येणार आहेत. यातला व्हीआयपी हा सुंपुर्ण वातानुकुलीत करण्यात आला आहे. तर स्युटमध्ये पर्यटकांसाठी आर्कषक फर्निचर आणि स्वच्छतागृहही बांधण्यात आलं आहे. तर त्या बंगल्या भोवती संरक्षण भिंतही बांधली आहे. सिंहगडावर संग्रहालय आणि मर्दानी खेळ खेळण्यासाठी ओपन अॅम्पीथिएटरही उपलब्ध आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला”

‘औवेसींना त्यांच्या महिला….’; अफगाणिस्तानसोबत भारताची बरोबरी केल्याने केंद्रीय मंत्री संतापल्या

निलेश लंकेंवर कारवाई?; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

‘नाशिकच्या विमानतळाला ‘हे’ नाव देण्यात यावं’; रामदास आठवलेंची नवी मागणी

“सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More