Job Update l महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे विभागाच्या अमरावती या प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा कार्यालयांतील कनिष्ठ लेखापाल (गट – क) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन (Online) माध्यमातून होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल (गट – क)
वेतन स्तर: एस १०-२९२००-९२३००
एकूण पदे: ४५
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात: २९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याची तारीख: संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाईन परीक्षेची तारीख: संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
Job Update l शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हता:
शैक्षणिक अर्हता: सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
तांत्रिक अर्हता: मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
वयोमर्यादा:
-किमान वय १९ वर्षांपेक्षा कमी नसावे.
-खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय ३८ वर्षे.
-मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय ४३ वर्षे.
-दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी कमाल वय ४५ वर्षे.
-मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना वयोमर्यादेतील शिथीलतेची सवलत यापैकी कोणतीही एकच सवलत मिळेल.
परीक्षा शुल्क:
-अराखीव (खुला) प्रवर्ग: १००० रुपये
-राखीव प्रवर्ग: ९०० रुपये
-माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ
अधिक माहिती:
या भरती प्रक्रियेची ही संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती २९ जानेवारी २०२५ पासून mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.