बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई |  कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 24 एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची पुढील तारीख जाहीर करणार आहे.

याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता 26 मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूकही पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान,  महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि पोलिस युद्धपातळीवर कोरोनाला हरवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हैदोस; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली इतक्या हजारांवर

आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More