राज्यात कुणाचं सरकार येणार?, प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकीत समोर

Maharashtra Vidhan Sabha 2024

Maharashtra Vidhan Sabha 2024 | महाराष्ट्रातील विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे. संपूर्ण देशाला महाराष्ट्रातील निकालाची प्रतीक्षा लागली आहे. अशातच निकालाबाबत विविध माध्यम संस्थांचे एक्झिट पोल्स समोर येत आहेत. त्यात कुणाची सत्ता येणार, याबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येणार की महायुती सत्ता कायम राखणार याबाबत प्रसिद्ध ज्योतिषांनी केलेलं भाकित समोर आलंय.

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत हे महत्वाचे असणार आहे. त्यात ग्रहस्थितीनुसार, विजयाचा निर्णय शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Vidhan Sabha 2024 )

कोण करणार सत्तास्थापन?

मविआमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 95 जागा मिळाल्या आहेत. आता यापैकी किती जागांवर ठाकरे गट विजयी होणार, ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे. कॉँग्रेस 101 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी 86 जागांवर लढत आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. भाजप तब्बल 149 जागांवर लढत आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 81 जागा, अजित पवार गटाला 59 जागा मिळाल्या आहेत. (Maharashtra Vidhan Sabha 2024 )

19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता फक्त नारळ फोडून शिवसेना संघटनेची स्थापना केली. त्यानंतर हळूहळू शिवसेना राजकारणात सक्रिय झाली. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे दोन पडले. आता या निवडणुकीत कोणती शिवसेना भारी पडणार, त्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे सर्वांना आता निकालाचे वेध लागले आहे.

कुणाला किती जागा मिळणार?

एका प्रसिद्ध एक्झिट पोलनूसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचा अंदाज समोर आला आहे.

भाजप- 78
काँग्रेस- 60
एनसीपी शरद पवार- 46
शिवसेना-उबाठा- 44
शिवसेना शिंदे गट – 26
एनसीपी-अजित पवार- 14
मनसे, वंचित, एमआयएम, अपक्ष व इतर- 20 जागा (Maharashtra Vidhan Sabha 2024 )

News Title – Maharashtra Vidhan Sabha 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, मनसेबाबत काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?

“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर

विधानसभेत जरांगे फॅक्टर ठरणार फेल?, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप

भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .