Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र त्यापूर्वी वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनुसार, राज्यात महायुतीला सर्वात जास्त जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी महायुतीला किती जागा मिळणार यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने :
दरम्यान, एक्झिट पोलनुसार जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे. तसेच 23 नोव्हेंबरला महायुतीच्या तब्बल 160 सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वात मोठा फटका बसला होता. तसेच लोकभेत तब्बल 42 जागांवरुन भाजपला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. पण, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज पोलमधून समोर आला आहे.
Maharashtra l महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? :
याशिवाय विधानसभा मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. पोलनुसार, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
तसेच राज्यात इतर व अपक्ष मिळून कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 29 जागा मिळतील असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
News Title – Maharashtra vidhansabha Election 2024 Suraj Chavan on Mahayuti seats
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादा ‘इतक्या’ मतांनी पडणार, बड्या नेत्याचा दावा
सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; काय आहेत सध्या किंमती?
पुण्यातील ‘या’ मतदारसंघात उमेदवारानं निकालाआधीच उधळला गुलाल!
विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?
मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर