Maharashtra l लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा तीन पक्षांनी मिळून लोकसभा निवडणूक लढवली आहे. यामध्ये राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप करताना महायुतीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजप पक्षाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीवर केले लक्ष केंद्रित :
मात्र आता भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्वबळावर ही निवडणूक लढविण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती झाल्या तर त्यात भाजप पक्षाला सर्वाधिक जागा निवडून येतील असा अंदाज भाजपकडून वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला विधानसभेच्या 150 हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तर महायुती 128 विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. महाआघाडीला मराठा, मुस्लिम आणि दलितांची मते मिळाली आहेत. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीला या मतांवर 17 जागाच जिंकता आल्या आहेत.
Maharashtra l भाजपची चिंता वाढली :
विधानसभेच्या 288 जागांपैकी प्रत्येकी किमान 80 जागांची मागणी शिंदे गट आणि अजित पवार गट करणार आहे. त्यामुळे त्यांना किमान प्रत्येकी 70 जागा या दोन गटाला दिल्या तर भाजपच्या वाट्याला केवळ 148 जागा येतात. त्यात 100 चा आकडा पार करणे देखील कठीण आहे. त्यामुळे बहुरंगी लढती झाल्या तर विधानसभेचे चित्र काय असेल ? तसेच महायुती विरुद्ध महाआघाडी अशी सरळ लढत झाली तर महाआघाडीचे पारडे जड होऊ शकते, असे भाजपला वाटत आहे.
भाजपला साथ दिल्यामुळे अजित पवार गटाकडे दलित आणि मुस्लिम तसेच काही प्रमाणात मराठा मतदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे विधानसभेला ही मते पुन्हा आघाडीकडे जाऊ शकतात. अजित पवार स्वतंत्र लढले तर त्यांच्या हिमतीवर जास्त जागा जिंकू शकतात, असा भाजपचा अंदाज आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत गद्दार म्हणून आघाडी कडून प्रचार केला जाईल, त्याला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सतावत आहे.
News Title – Maharashtra Vidhansabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?
आज रंगणार भारत विरुद्ध अमेरिका थरार; कोण वरचढ ठरणार?
पंकजाताईंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागला; बीडमध्ये अजूनही घडतंय बरचं काही
मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली! रात्री अडीच वाजता सलाईन लावली