Loading...

राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय; आव्हाडांच खोचक असं ट्विट!

मुंबई | राज्यात अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा कायम असून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मात्र याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक असं ट्विटं केलं आहे.

अस्थिर परिस्थितीत आमदार फुटू नयेत यासाठी एकीकडे काँग्रेसने आमदारांना रंगशारदा हॉटेल तर काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना कुठेही नेलेलं नाही, कारण सगळ्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम’ असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

Loading...

महाराष्ट्र विधानसभेचा मुदत आता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

 

Loading...

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...