भाजपने विधानसभेला ‘ती’ चूक टाळली; भाजपच्या यशाचं गुपित समोर

Mahayuti

Maharashtra Vidhansabha Result 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दैदीप्यमान यश मिळवलं आहे. महायुतीच्या तब्बल 234 जागा जिंकून आल्या. त्यात भाजप वरचढ ठरला. भाजपने 132 जागा आपल्या नावे केल्या. भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळण्यामागे आरएसएस महत्वाचा घटक असल्याचे मानले जात आहे. लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता. लोकसभेतील पराभवामागील चुका भाजपने यावेळी दुरुस्त केल्या. (Maharashtra Vidhansabha Result 2024)

लोकसभेवेळी भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी आम्हाला विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचा कांगावा केला होता. लोकसभेच्या निकालानंतर भाजप आणि आरएसएसमध्ये संबंध देखील ताणल्या गेले होते. आरएसएसला निवडणुकीपासून लांब ठेवल्याचा त्यांना लोकसभेत फटका बसला होता. या विधानसभेत ही चूक भाजपने टाळली.

भाजपचे वरिष्ठ नेते जे.पी. नड्डा यांचा एक कार्यक्रम वगळता ते या निवडणुकीत फिरून दिसले नाहीत. पुढील सूत्र संघाने हाती घेतल्यानंतर भाजपाला राज्यात विजयाचा मार्ग मोकळा आणि अधिक स्पष्ट झाला. आरएसएसची भूमिका महायुतीच्या विजयात मौल्यवान ठरली. महाविकास आघाडीचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज त्यावर बोलून दाखवलं. आरएसएसने केलेला प्रचार यामुळे आम्हाला फटका बसला, असं राऊत म्हणाले.

महायुतीच्या विजयामागील गुपित-

1. संघटन कौशल्याचा फायदा : भाजपला निवडणुकीत संघाच्या संघटन कौशल्याचा फायदा झाला. संघ स्वयंसेवकांनी राज्यातील काना-कोपर्‍यात बैठकांवर जोर दिला. नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्र हित, हिंदुत्व, सुशासन, विकास, लोक कल्याण आणि एकसंघ समाज या मुद्द्यावर त्यांनी अधिक जोर देत जनतेचा विश्वास प्राप्त केला. (Maharashtra Vidhansabha Result 2024)

2. मराठा-ओबीसी संघर्ष : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलेला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी करण्यात येणारे आंदोलन तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे समाजात मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यात हिंदूहिताचे सरकार हा विचार संघाने तरुणाईच्या मनात रुजवला. कोणतेही आश्वासन न देता हिंदू हिताचे सरकार, हा विचार त्यांनी पेरला. हाच विचार निवडणुकीत फायद्याचा ठरला.

3. संघावरील विश्वास : आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला ग्राऊंडवर मोठी मदत केली आहे. संघटना राजकारणात नसली तरी भाजपाला संघाने कायमच मदत केली आहे. भाजपनेही यावेळी संघावर विश्वास दाखवला. मतदान होताच देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट देखील घेतली होती. (Maharashtra Vidhansabha Result 2024)

News Title –  Maharashtra Vidhansabha Result 2024 mahayuti 

महत्त्वाच्या बातम्या-

निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”

मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार का?

शिंदेसेना ठरली वरचढ, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करची पोस्ट; म्हणाली, “EVM मध्ये घोटाळा..”

विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .