ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार

Maharashtra

Vidhansabha Election l राज्यभर विधासभा निवडणुकीचं वार जोमानं फिरत आहे. या विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी मैदानात उतरून दंड थोपटणार आहेत. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची कंबर कसली आहे. महाविकास आघाडी देखील राज्यभर बैठकांच्या माध्यमातून संवाद यात्रेला सुरवात करणार आहेत. अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुती सरकार प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘या’ दिवशी फुटणार प्रचाराचा नारळ :

विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राजकीय पटलावर रंगणार आहे. यापार्श्वभूमीवर महायुती 20 ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. तर महाविकास आघाडी 16 ऑगस्ट ला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. यावेळी महायुतीसह महाविकास आघाडी देखील संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला सरावात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. कारण राज्यात महायुतीची सत्ता कायम ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. तर सत्ताधारी युतीला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नात आहे. मात्र आता दोन्ही पक्षांनी कंबर कसून आपली रणनीती आखली आहे.

Vidhansabha Election l दोन्ही पक्षांची रणनिती काय आहे? :

येत्या 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉल मुंबई येथे महाविकास आघाडीची पहिली सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच रणशिंग फुकंणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून आजपासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात देखील झाली आहे.

महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी देखील आपल्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी समन्वय समितीच्या बैठक घेतली आहे. त्यामुळे येत्या 20 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहेत. यावेळी महायुतीचे 288 मतदार संघामध्ये ही संवाद यात्रा होणार आहे.

News Title- Maharashtra vidhasabha elelction propaganda start

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल

पुणे ते बीड 250 किलोमीटर, बजरंग सोनवणेंनी संसदेत बोलताना सांगितलं 500 किलोमीटर!

पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये

मोठी बातमी! अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांचा आपघात?, नक्की काय घडलं?

निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसणार? ‘या’ मित्रपक्षाने दिला वेगळा होण्याचा अल्टिमेटम

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .