बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्राला मिळणार होता पण…”

मुंबई |  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनावरून टीका चालू आहे. मात्र अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळण्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले, निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. पण मधल्या काळात घडामोडी झाल्या त्यात वेगळं राजकारण झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नसल्याचं राजेंद्र शिंगणे म्हणाले.

सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही. दुर्देवाने खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणं असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं असल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

दरम्यान, रेमडेसिवीर कंपन्यांचे उत्पादन वाढत चाललं आहे. किमान एक स्टॉक बाहेर पडायला 20-22 दिवस लागतील. निर्यातबंदीमुळे 12-13 कंपन्यांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रात विकाव्या यासाठी एफडीएचा प्रयत्न आहे. 3-4 कंपन्यांनी रिपॉन्स दिला आणखी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. राज्यातील जनतेसाठी रेमडेसिवीर उपलब्ध होईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं शिंगणे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

18 वर्षावरील व्यक्तींना लस घेण्यासाठी काय काय करावं लागेल?; जाणून घ्या संपुर्ण माहिती

“माझ्या पत्नी आणि मुलीलाही…”; पुतण्याच्या लसीकरणाच्या फोटोवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, कुटुंबातील 7 जणांवर केले कुऱ्हाडीने वार

पुण्यातील धक्कादायक घटना, अंत्यसंस्काराला तोबा गर्दी, मृताचे पाय धुवून पाणीही पिलं!

15 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More