Maharashtra Weather | देशभरात सध्या हवामानातील मोठे तफावत पाहायला मिळत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पश्चिमी झंझावाच्या प्रभावामुळे तापमान घटले आहे. अनेक पर्वतीय भाग पुन्हा एकदा बर्फाच्छादित झाले असून, मैदान भागातही पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मध्य भारत आणि ईशान्य भारतात हवामान स्थिर आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तापमान वाढू लागले आहे. (Maharashtra Weather )
महाराष्ट्रातील तापमानात मोठी तफावत
राज्यात सध्या विरोधाभासी हवामान स्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील अनेक ठिकाणी तापमान उच्चांक गाठत असताना, निफाडमध्ये तापमान 4 ते 5 अंशांपर्यंत घसरले आहे. मागील 24 तासांत सिंधुदुर्ग येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तिथे पारा 40 अंशांवर पोहोचला आहे.
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा
पुढील 48 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला आहे. रविवारी आणि सोमवारी उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना कडाक्याच्या उन्हात घराबाहेर जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather )
राज्यातील किनारपट्टी भागात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान झपाट्याने वाढत आहे. हवामान विभागाने मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Title : Maharashtra weather Heatwave Alert