आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

Maharashtra Weather News 16 october 

Maharashtra Weather News | नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला. मान्सून परतल्यानंतरही राज्यात पावसाला पोषक हवामान सध्या दिसून येत आहे. आज राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather News)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तर, उर्वरित राज्यात ऊन-पाऊस असं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये.

इतर राज्याबाबत बोलायचे झाल्यास, तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. पावसामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये सुट्टी चे आदेश देण्यात आले आहेत.
14 ऑक्टोबररोजी तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस झाला, यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. (Maharashtra Weather News)

मंगळवारी राज्यात नोंदवलेले तापमान

पुणे- 33.7 सेल्सिअस, जळगाव- 32.4 सेल्सिअस, कोल्हापूर- 31.1 सेल्सिअस, महाबळेश्वर- 27.5 सेल्सिअस, मालेगाव- 31.2 सेल्सिअस, नाशिक- 32 सेल्सिअस, निफाड- 32 सेल्सिअस, सांगली 2.3 सेल्सिअस,  सांताक्रूझ- 33.9 सेल्सिअस, डहाणू- 32.6 सेल्सिअस (Maharashtra Weather News)

छत्रपती संभाजीनगर- 32.6 सेल्सिअस, धाराशिव- 32.6 सेल्सिअस, परभणी- 33 सेल्सिअस, अकोला- 35.5 सेल्सिअस, अमरावती- 34 सेल्सिअस, भंडारा- 32 सेल्सिअस, बुलडाणा- 29.6 सेल्सिअस, चंदपूर 35 सेल्सिअस.

News Title :  Maharashtra Weather News 16 october 

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी

कोजागिरी पौर्णिमेला 3 राशींचं भाग्य उजळणार, नोकरी ते विवाहातील सर्व अडथळे दूर होणार!

आज कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी!

आज कोजागिरी पौर्णिमा, 12 पैकी ‘या’ राशींना होणार धनलाभ!

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाचा महत्त्वाचा निर्णय!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .