Maharashtra Weather News | नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी काही ठिकाणी अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत. तर, काही ठिकाणी पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशात हवामान विभागाकडून पुढील 24 तासात राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात दिला आहे. (Maharashtra Weather News)
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा किनारपट्टी भागाकडे पुढे येत आहे. येत्या काळात कमी दाबाचं हे क्षेत्र नेल्लोर आणि पुदुच्चेरी जवळ किनाऱ्यावर धडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुढील पाच दिवस पावसाचे
यामुळे तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये मुंबई शहर, उपनगरासह कोकणात मध्यम पावसाची शक्यता आहे. 17 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पाऊस होईल.
हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather News)
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर येथेही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये देखील पाऊस सुरू आहे. (Maharashtra Weather News)
News Title : Maharashtra Weather News 17 october
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव
वरळीमध्ये रंगणार हायप्रोफाईल सामना, महायुतीची मोठी खेळी?
मोठी बातमी! समीर वानखेडे ‘या’ पक्षाकडून विधानसभा लढवणार?
पुण्यात बड्या व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये