राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather News l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. कारण बंगालच्या उपसागरातील वादळी वारे आणि देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी यामुळे हवामानामध्ये वारंवार बदल होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील अनेक भागांमधील थंडी कमी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली आहे. कारण गहू, हरभरा पिकाला धोका आहे. मात्र आता राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये कोकण पट्टा आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये अधिक तापमानवाढीची नोंद देखील करण्यात आल्यामुळं या भागांवर अवकाळी पावसाचं सावट आहे.

याशिवाय दक्षिण महाराष्ट्रातील भागाला वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात देखील उन्हाचा दाह सहन करावा लागणार आहे. तसेच पावसामुळे ढगांचं सावट असलं तरी देखील उष्णता मात्र कमी होणार नाही असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Weather News l पावसाचं सावट कधी कमी होणार? :

किनारपट्टी जवळील समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होत असल्याचं दिसून येत आहे. तर उत्तरेकडे असणाऱ्या काश्मीर खोऱ्यामध्ये हिमवृष्टीसाठी पूरक वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तरेकडे वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळं उद्या म्हणजेच 8 डिसेंबरनंतर शीतलहरी वेगानं तर मध्य भारताच्या दिशेनं येणार असून अनेक राज्यांमध्ये तापमानात घट नोंदवण्यात येणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात देखील पावसाचं सावट पुढील 48 तासांमध्ये दूर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय वातावरण देखील होणार आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास भर हिवाळ्यात पावसाचं सावट असणार आहे.

News Title – Maharashtra Weather News

महत्त्वाच्या बातम्या-

खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?

‘त्या’ प्रकरणी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा!

आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त

हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा

जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवीन डेडलाईन; थेट इशारा देत म्हणाले…