Maharashtra Weather News | देशात सध्या काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले. पाऊस सध्या कमी झाला असला तरी बडोदा येथे पुरस्थिती कायम आहे. वडोदरा आणि आणखी शहरात देखील पुरपरिस्थिती कायम आहे. (Maharashtra Weather News)
दुसरीकडे, महाराष्ट्रात सध्या काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलीये. तर, काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, इथं पाऊस पुन्हा जोर धरताना दिसत आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या गडचिरोली, चंद्रपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
सध्या कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून उदयपूर, सिधी, अंबिकापूर, पूरी आणि बंगालच्या उपसागरासापर्यंत सक्रिय असून, केरळच्या मध्यापासून दक्षिण गुजरातपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे येथे पावसाचा जोर वाढला आहे.
हवामानाच्या या स्थितीचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी काही ठिकाणी हायअलर्ट दिला आहे. हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather News)
यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबणार
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथील 11 जिल्हयामध्ये सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह अधूनमधून 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather News)
याचसोबत मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.यामुळे खरीप काढणीला फटका तर, रब्बीच्या पेरणीला फायदा होणार आहे.
News Title- Maharashtra Weather News 30 august
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त?, जाणून घ्या लेटेस्ट दर
आज लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशी होणार धनवान, सर्व अडचणीही दूर होणार!
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
पुण्यातील ‘या’ भागात एटीएसची मोठी कारवाई! थेट दहशतवाद्यांशी संबंध…?
भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार; कोणती भूमिका साकारणार?