ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?

Weather Update

Maharashtra Weather News | महाराष्ट्रातील हवामानात सध्या लक्षणीय बदल दिसून येत आहे. राज्यातील तापमानात पुढील 24 तासांमध्ये चढ- उतार अपेक्षित आहे. हवामान विभागाने आज (23 डिसेंबर) काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 10 अंशांच्या वर गेलाय. सोलापूर येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. (Maharashtra Weather News )

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवस या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आजपासून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे.

पुढील 24 तासांत हवामान बदलणार

मध्य महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात 17 ते 20 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये 16.4, कोल्हापूर 17.7 अंशांची नोंद झाली. तर नगरमध्ये 18 अंश सेल्सियस तापमान नोंद झाली. मराठवाड्यात बीड, लातूरमध्ये 20 अंश सेल्सियसची नोंद झाली.छत्रपती संभाजीनगरमये देखील 18.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. (Maharashtra Weather News )

देशातील जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम असून येथील कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झालीये.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

आज पहाटेपासूनच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. विदर्भात देखील पावसाची स्थिती आहे.हवामान विभागाने पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होऊन राज्यात थंडीचा जोर कमी होणार आहे. (Maharashtra Weather News )

ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना पावसामुळे मोठा फटका बसू शकतो. वातावरणमध्ये होणाऱ्या या बदलामुळे आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे थंडी, ताप आणि खोकल्याचा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

News Title –  Maharashtra Weather News  today update  

महत्त्वाच्या बातम्या-

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार

छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…

पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .