थंडीत पाऊसही लावणार हजेरी, पाहा राज्यात कुठे-कुठे बरसणार?

Maharashtra Weather News Today

Maharashtra Weather News Today | देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही दिसून येतोय. राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान 10 अंशांवर पोहोचलं असतानाही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather News Today)

पुढील 24 तासात राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. येथे पारा 5 अंशांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज-

तर सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, येथे तापमान 33 अंशांच्या घरात राहील असा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोकणात 11 जानेवारीरोजी तर मध्य महाराष्ट्रात 12 आणि 13 तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यातही पावसाच्या सरी बरसणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे. येथे थंडीचा जोरही वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे थंडीत वाढ झाली आहे. अशात पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय. (Maharashtra Weather News Today)

पुण्यात कसं राहील हवामान?

पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच 4 ते 5 दिवस दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather News Today)

देशभरातील हवामानाचा विचार केल्यास सध्या दिल्लीमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. तर उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत असून, हिमाचल प्रदेशातील शिमला, स्पितीचं खोरं आणि इतर क्षेत्रांमध्ये जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

News Title : Maharashtra Weather News Today

महत्वाच्या बातम्या –

‘…तर कायमची वाट लावेन, हात-पाय तोडेन’; चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडची धमकी?

सरपंच हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, वाल्मिक कराडचा पाय खोलात?

लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .