पुढील काही दिवस राज्यात अशाप्रकारे असणार हवामान?

Weather News

Weather News l दिवसेंदिवस राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. जुलै महिन्यात पावसाने राज्यातील सर्वच भागात हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातल्याने तेथील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याची चित्र दिसून येत आहे.

राज्याच्या काही भागांमधील पावसाचा जोर ओसरला :

मागील काही दिवसांपासून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच श्रावणमहिन्याचा प्रारंभ होताच राज्यातील हवामानाचा बदललेला अंदाज पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांच्या हवामानाचा आढावा घेतल्यास राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी बरसत आहेत.

राज्यात विदर्भासह कोकण आणि घाटमाथ्यांवरील विविध भागांमध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे पुढील 24 तासांसाठी या भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.

Weather News l पुढील 24 तासांसाठी ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता :

राज्यातील हवामानाची स्थिती पाहता पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 25°C च्या आसपास असणार आहे असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

तसेच राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, नाशिक, सांगलीसह इतरही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावणार आहेत. याशिवाय राज्यातील ढगाळ वातावरण पाहता फार कमी भागांमध्ये पाऊस सरासरीहून पुढचा आकडा गाठणार असल्याचं चित्र दिसत आहे.

News Title : Maharashtra Weather News

महत्त्वाच्या बातम्या

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा

राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना

विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना कधी व कुठे पाहता येणार?

रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .