महाराष्ट्रातील हवामानात मोठे चढउतार; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Weather Temperature Rises Heatwave Continues 

Maharashtra Weather | राज्यातील तापमानात अचानक बदल होऊन वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. (Maharashtra Weather)

तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत

राज्यातील कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वाढलेले तापमान कायम राहणार आहे. पुणे (Pune) येथील हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार (Sudeep Kumar) यांनी अचानक झालेल्या तापमान वाढीचे कारण सांगितले आहे.

तापमान वाढीचे कारण

हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार (Sudeep Kumar) यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन दिवस 34 ते 35 अंश सेल्सियस तापमान असणार आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन अंश सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दिवसा ऊन, रात्री थंडी

राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे, तर रात्री थंडी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर (Holi) तापमान वाढ होत असते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या (February) मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारणपणे दोन-तीन दिवस असणार आहे. गेल्या 24 तासांत सोलापूर (Solapur), सांगली (Sangli), परभणी (Parbhani), विदर्भातील ब्रह्मपुरी (Brahmapuri), अकोला (Akola), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha) या भागातील तापमान 36 अंशांवर गेले. (Maharashtra Weather)

पुण्यात (Pune) उच्चांकी तापमान

पुणे (Pune) शहरातील कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत पुण्यात (Pune) कडक ऊन होते. त्यावेळी कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) 38.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले, यामुळे पुणेकरांना (Punekars) उन्हाचा चटका जाणवत होता. तापमान वाढीमुळे ठिकठिकाणी रुमाल आणि टोप्यांची दुकाने दिसू लागली आहेत.

Title : Maharashtra Weather Temperature Rises Heatwave Continues 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .